आपण व्यवसाय करतात आणि आपल्याकडे वेबसाइट नाही? जर तुमचं उत्तर असेल कि नाही आमच्याकडे वेबसाइट, तर आपला व्यवसाय अस्तित्वात असून सुद्धा तरी तो जवळजवळ नाही आहे . या आधुनिक काळात, माहितीसाठी लोक आणि कंपन्या इंटरनेटवर येतात. बर मग वेबसाइट असल्यावर लोक आपल्या वेबसाइट का भेट देतात? तर प्रामुख्याने माहिती शोधण्यासाठी.
आताच्या व्यावसायिक जगतात आपल्याला आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी वेबसाइट एक महत्वपूर्ण भूमिका निभावते. वेबसाइट च्या माध्यमातून ग्राहकांना आपण आपल्या सेवा, उत्पादने, वा सुविधांबद्दल सांगू शकतो.
खाली काही आपल्या व्यवसायासाठी वेबसाइट असण्याचे काही फायदे देत आहोत.
1. प्रतिष्ठा किंवा ब्रँड तयार करते:
केवळ ऑनलाइन व्यवसाय असल्याने केवळ आपला लहानटला लहान व्यवसाय श्रेय घेण्यास पात्र असेल. नुसता विचार करा, जेव्हा आपल्याला काही वस्तू घ्यायची असेल, तर आपण लगेच ती गोष्ट Google ला जाऊन सर्च करतो, आणि या सर्च मधून अशी वेबसाइट निवडतो ज्यातून व्यवस्तीत माहिती आणि वेबसाइट ला चांगले Reviews आहेत. असं म्हटलं जात कि, आपलं Google सोबत Updated राहणं गरजेचं आहे. Professional राहावं लागेल आणि वेबसाइट असल्यावर तिला Google Search मध्ये आणायची आपण प्रयत्नशील राहणे गरजेचं आहे.
2. बनविण्यास सोपं:
आपल्यातून बरेच जण लहान व्यवसायासाठी कठीण वेबसाइट बनवण्याच्या फंद्यात खूप सारा वेळ वाया घालवतात. इंटरनेट वर बरेचसे ऑनलाईन वेबसाइट बिल्डर आहेत ज्यांचा वापर करून तुम्ही अगदी कमी वेळात म्हणजेच Content तयार असेल तर २-३ तासात तुमची वेबसाइट उभारू शकतात. यात जसे कि, WordPress & Wix
3. खर्च कमी करते:
आपला व्यवसाय ऑनलाईन असल्याने बऱ्याच अशा गोष्टींमध्ये आपला खर्च वाचतो जसे कि कामगारांचा पगार, जागेच भाडे, आणि बरेच असे खर्च. परत व्यवसाय ऑनलाईन असल्यामुळे, 24 तास आपण आपल्या ग्राहकांच्या सेवेत हजार राहतो. आपण ग्राहकांशी थेट संपर्क साधू शकता आणि कमी किंमतीमध्ये डिलिव्हरी ची व्यवस्था करू शकता. दुसरीकडे, जर आपण मोठी कंपनी आहात तर आपण आपल्या कर्मचार्यांच्या सदस्यांशी संवाद साधू शकता. जे तुमच्या Internal Forum च्या माध्यमातून या सर्व गोष्टी हाताळू शकतात.
4. ग्राहक सेवा सुधारते:
हे एक ज्ञात तथ्य आहे की वेब उपस्थिती असणे आपल्याला आपली ग्राहक सेवा सुधारण्यात मदत करू शकते. आपण स्टोअरचे मालक असल्यास आणि आपल्याकडे कर्मचारी असल्यास आपण ते क्लायंटसोबत कसे परस्परसंवाद करीत आहात हे पहाण्यासाठी आपण त्यांचे पर्यवेक्षण करू शकत नाही. परंतु ऑनलाइन जगात, काहीही गुप्त राहत नाही; आपण आपल्या कर्मचार्यांच्या कार्याचे परीक्षण करू शकता आणि आपल्या ग्राहकांना जलद आणि उपयुक्त उत्तर मिळत असल्याचे सुनिश्चित करू शकता.
5. 24 तास आपला व्यवसाय चालू राहील:
वेबसाइट आपल्यासाठी आणि आपल्या ग्राहकांसाठी 24/7, 365 दिवस वर्षात उपलब्ध आहे. जर ते सकाळी 1 वाजता जागे होत असतील आणि आपल्याकडून काहीतरी खरेदी करण्याचा विचार करत असतील तर ते आपल्या साइटवर क्लिक करू शकतात आणि ते तत्काळ खरेदी करू शकतात - सर्वांसाठी एक चांगली स्थिती. ऑनलाइन स्टोअर असल्यास आपले ऑफिस किंवा स्टोर बंद असताना सुद्धा ग्राहकांना आपल्या उत्पादनांचे आणि सेवांचे पुनरावलोकन (Reviewing) करण्याची सुविधा प्रदान करते.
6. मोठया बाजाराला आपण लक्ष्य करु शकतो:
आपण उत्पादने किंवा सेवा प्रदान करीत असलात तर त्यांची विक्री करण्यासाठी एक ऑनलाइन वेबसाइट एक पर्याय आहे. केवळ वेब उपस्थितीद्वारे आपण इतर शहर किंवा देशाच्या ग्राहकांपर्यंत पोहोचू शकता. आपल्या व्यस्त जीवनशैलीमध्ये आपण आता ऑनलाइन ब्राउझिंगला जास्त प्राधान्य देत आहोत. पहिले दुकानात जाऊन उत्पादनांची तपासणी करून खरेदी केली जात असे. ऑनलाईन वेबसाइट द्वारे आपण अधिकाधिक उत्पादन अगदी जलद गतीने आपल्या ग्राहकांना दाखवू शकतो.
7. आपण रिटर्न बिझनेस करु शकतात (ग्राहक वारंवार आपले उत्पादने खरेदी करु शकतील):
कोणीही तुमचे व्यवसाय कार्ड सहजपणे गमावू शकतो किंवा शेजारच्यांनी शेजारच्या सुचवलेल्या व्यावसायिकाचा नावचा आपल्याला विसर पडू शकतो. त्याचठिकाणी आपल्याकडे वेबसाइट असल्यास जेव्हा पण आपल्या ग्राहकांना गरज असेल ते आपल्या वेबसाइट ला येऊन माहिती मिळवू शकतात किंवा उत्पादनाची खरेदी करू शकतात. आणि ऑनलाईन Conversation साठी असलेल्या Tools चा वापर करून आपल्या ग्राहकांच्या तक्रार, प्रश्न, शंकांचे निवासरण करून त्यांना मदत करु शकतो.
असे अनेकानेक फायदे आहेत जे आपल्याला आपल्या व्यवसायाच्या प्रगतीमध्ये मदतगार ठरतात.
तुम्ही नवीन व्यवसाय सुरु केलाय पण अजून आपली वेबसाइट बनवली नसेल, तर लवकर बनवून घ्या. आणि तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकतात.
तुम्हाला हा लेख कसा वाटला कंमेंट मध्ये नक्की कळवा जेणे करून आम्हाला अजून लिहिण्याची प्रेरणा मिळेल.
Happy Digital Learning..!!!
Learn Digital! Go Digital!
Comments