top of page
Search
Writer's pictureNikhil Morankar

ब्लॉग सुरु करण्यापूर्वी महत्वाच्या ७ गोष्टी । 7 Important Things Before Strating Blog

Updated: Mar 15, 2019


Important Things Before Starting Blog
Important Things Before Starting Blog

ब्लॉग लिहिणे सुरु करायचा विचार करताय?


तर मग हा लेख तुमच्याच साठी आहे. ब्लॉग सुरु करण्यापूर्वी काही गोष्टींची तयारी आपण करणे गरजेचे आहे.


यशस्वी ब्लॉगर बनण्यासाठी चांगल्या Content सोबत संयम, नियमितता, आणि कष्ट घेण्याची तयारी असणे गरजेचं आहे. कारण आपण आज ब्लॉग चालू केला आणि लगेच आपल्याला त्यातून प्रतिसाद मिळेल असे नाही. पण जर संयम बाळगून आपण नियमित कष्ट घेतले तर नक्कीच आपण एक यशस्वी ब्लॉगर म्हणून सर्वंवांसमोर येऊ शकतात.


आता मग लगेच प्रतिसातद मिळणार नाही म्हणून आपण निराश होता काम नये, उलट मला तुम्हाला यातून प्रोत्साहित करायचंय. आपण जास्तीत जास्त मेहनत करून आपले ध्येय साध्य करू शकतो, आणि कष्ट करण्याची तयारी आपण पहिलेच करून घेतली कि आपोआप संयम आणि चिकाटी वाढते आणि आपण आपल्या ठरवलेल्या पायरी पर्यंत पोहोचतो. आणि मी तुम्हाला निश्चित सांगू शकतो कि तुम्ही मनाची तयारी केली तर नक्कीच अगदी काही दिवसातच यशस्वी ब्लॉगर म्हणून व्हाल!


ओह, मी तर पहिलेच ब्लॉग सुरु केलाय? मग आता?- काळजी नसावी फक्त हि यादी चेक करून घ्या, आणि आवश्यक ते बदल करून तोच ब्लॉग सुरु ठेवा.


मग, मी ब्लॉग लिहितोय, पण माझा यातून फायदा काय? तर हो, तुम्ही ब्लॉगच्या साहाय्याने पैसे कमावू शकतात. Google Adsense च्या मदतीने. यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहे यावर लवकरच मी एक लेख लिहणार आहे. पण त्याच्या पहिले महत्वाचा आहे आजचा विषय.


चला तर मग जाणून घेऊ कि कोणत्या गोष्टी आहेत ज्या ब्लॉग सुरु करण्या पहिले आपल्याला माहित असणे गरजेचं आहे.


१. तुमचा वाचक ओळखा? (तुमचा ब्लॉग च्या विषय ठरवा)

- आपल्याला ब्लॉग सुरु करण्यापूर्वी आपला वाचकवर्ग कोण आहे याकडे लक्ष देणे अतिशय गरजेचं आहे.

- तुम्ही कोणासाठी ब्लॉग लिहिणार आहात याची या बाबतीत आपण ठाम असं गरजेचं आहे. आणि जो वाचक वर्ग तुम्ही निवडत आहात त्यांच्या आवडीनिवडी बाबतीत माहिती असं आपल्याला गरजेचं आहे.

- वाचकांचा विचार करणे अतिशय महत्वाच आहे, जर वाचक वाचतील तरच आपण लिहू. म्हणून, आपल्याला आपण ठरवलेल्या वाचक वर्गाची रुची कोणत्या विषयामध्ये आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे


२. तुम्ही कोण आहात?

- आता साहजिकच तुम्हाला प्रश्न पडला असेल कि तुम्ही कोण आहेत हा कसला प्रश्न आहे? तर हो तुम्हाला स्वतःला ओळखणं गरजेचं आहे

- जस कि तुम्ही ज्या क्षेत्रात काम करताय त्या क्षेत्रात तुमची रुची किती आहे, आणि त्या विषयावर तुम्ही किती लिहू शकतात. हे जाणून घेणे अगदी महत्वाचे आहे.

- आता बरेच जण ब्लॉग वरून आपले Products विकतील तर बाकीचे लोक आपल्या Ideas विकतील. लोकांनी तुमच्या लेखांवर वेळ देणं सुद्धा इडिअस विकण्यासारखं आहे, कारण विनाकारण कोणी आपला वेळ वाया घालवणार नाही.

- स्वतःला ओळखून आपली उत्पादकता आणि भक्कम बाजू जाणून घेणं महत्वाचं आहे.


३. तुम्हाला का सुरु करायचाय?

- आता आपण एका महत्वाच्या मुद्यावर आलोय आपण आपला वाचक ओळखला, स्वतःची वरचढ बाजू समजून घेतली, आता आपल्याला आपलं ब्लॉग सुरु करण्या मागच उद्दिष्ट ठरवायचं.

- काही व्यक्तींना आपल्या ideas लोकांपर्यंत पोहोचवाच्या असतील

- काही व्यक्ती आपले Products ब्लॉग वरून विकू पाहतील

- काही व्यक्तींचं उद्दिष्ट असेल कि चांगलं Content लिहून Google Adsense च्या साहाय्याने पैसे कमवायचे

तुमचं उद्दिष्ट काय आहे त्याबाबतीत स्पष्ट व्हा. कोणत्याची एकाच पर्यायाचा निवड करणे अधिक सोपे आणि फायदेशीर ठरेल, असं मला वाटते.


४ विषय ठरवा व १० ब्लॉग पोस्ट तयार करून घ्या

- आता आपल्याला वरच्या ३ पॉईंट्स चा विचार करून आपला विषय ठरवायचंय

- विषय निवडतांना विषयाची गंभीरता जाणून घेणे गरजेचं आहे. तुम्ही मनोरंजन, साहित्य, पत्रकारिता, खेळ, चालू घडामोडी, इतिहास, ऐतिहासिक वास्तू, शहर, नवीन तंत्रज्ञान इ. जो पण निवडाल त्याबद्दल आवश्यक माहिती आपणास असणे गरजेच आहे.

- विषय निवड करत असताना आपण जास्त लिहिता येइल असा विषय निवडणे आवश्यक आहे. कारण आपल्याला नियमित व अखंडित ब्लॉग लिहायचा आहे. जर आपण लहान विषय निवडला तर आपल्याला जास्तीत जास्त Traffic ला लक्ष्य करता येणार नाही.

- विषयांची निवड झाल्यावर कमीत कमी १० पोस्ट्स तयार ठेवा म्हणजे सुरुवातीलाच ब्लॉग बंद होण्याचा प्रश्न उद्भवणार नाही.


५. छोटं लक्ष्य केंद्रित करा Small Goals

आता आपण एक लक्ष्य ठरवू जसे कि,

- ६ महिन्यात १००० Email Subscriber

- १ महिन्यात ३० लेख व प्रत्येक लेखास १०० Post Views

- २ महिन्यात ५० नवीन sites वर ब्लॉग share करणार, इ.


असे आपले लक्ष्य ठरवावेत, जेणे करून आपण अजून जोमाने काम करु.


६. Blog Name व Domain Name ठरवा आणि ते Available आहे कि नाही ते चेक करून घ्या.

- आता तुम्ही जो पण platform वापरणार असाल त्यावर तुम्ही Blog Name व Domain Name Available आहे कि नाही हे चेक करून घ्या.

- फ्री ब्लॉग तुम्ही, Blogspot, Weekbly, Wordpress, Wix सारख्या साईट्स वर जाऊन तयार करू शकतात

- स्वतःचा Domain Name घेऊन ब्लॉग सुरु करणार असाल तर Domain नाव विकत घेऊन तत्याला तुम्ही Wordpress किंवा Wix सारख्या Framework ला जोडून आपला ब्लॉग सुरु करु शकतात.

- तसेच Domain सोबत Hosting ची आवश्यकता आहे कि नाही हे चेक करून घ्या (स्वतःच्या ब्लॉग साठी आवश्यक, फ्री ब्लॉग्स मध्ये Sub Domain व फ्री Space आपल्याला भेटते.)


७. Setup Special ई-मेल

- ब्लॉग साठी एक Special ई-मेल तयार करून घ्या.

- Domain, Hosting विकत घेत असाल तर एक Business E-Mail तुम्ही तयार करून घेऊ शकता

- फ्री ब्लॉग वापरताना Gmail चा Mail Id पण पुरेसा आहे.


वरील ७ गोष्टी तुम्हाला ब्लॉग सुरु करण्याच्या पहिले चेक करणे गरजेचं आहे.

ब्लॉग लिहिताना सुरवातीच्या काळात येणाऱ्या सर्व अडचणी वरच्या कारणांमुळेच येतात

आणि आपल्या ब्लॉगची सुरुवात आपल्याला शेवट करायची नाही म्हणून ह्या तयारीने तुम्ही तुमच्या ब्लॉग ला सुरुवात करा.


तुम्हाला हा लेख कसा वाटला कंमेंट मध्ये नक्की कळवा जेणे करून आम्हाला अजून लिहिण्याची प्रेरणा मिळेल.


Happy Digital Learning..!!!

Learn Digital! Go Digital!

404 views4 comments

Recent Posts

See All

4 Comments


Pratiksha Medhane
Pratiksha Medhane
Mar 16, 2019

Hello sir, can you please explain how to increase traffic on our blog?


Like

megharaj.jayshree
Mar 12, 2019

Nice blog... Please explain the how to maintain targeted traffic

Like

tejas bichave
tejas bichave
Mar 09, 2019

Sir,can you please explain ,what is the difference between a website and blog ,,and when to go for a website and when to go for writing blog


Like

rahulpatil.rajpatil
Mar 09, 2019

Nice blog.. And useful tips for beginners to learn how to create it.. Well keep it up have lots of wishes.. Bless you

Like
bottom of page