top of page
Search
Writer's pictureNikhil Morankar

भारतात सर्वाधिक वापरले जाणारे 3 सोशल मिडिया | The Most Widely Used 3 Social Media Platforms



The Most Widely Used Social Media Platforms in India
The Most Widely Used Social Media Platforms in India

21च्या शतकाची प्रगती बघता,आता आपण सोशल मिडिया च्या युगात आहोत. मार्केटिंग पासून ब्रॅण्डिंगपर्यंत व डिस्कशन पासून डिबेट पर्यंत सगळ्याच गोष्टींसाठी आपण सोशल मिडिया च्या वापर करतोय. लहानातून लहान गोष्टींसोबत आता आपण सोशल मिडिया वर एक्सप्रेस होऊ लागलोय. चला तर मग जाणून घेऊया अशाच भारतातील लोकप्रिय व सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या सोशल मिडियांबद्दल.


1. फेसबुक । Facebook

2004 साली मार्क झुकरबर्ग व त्याच्या 4 साथीदारांनी मिळून फेसबुक सुरु केले. या 15 वर्षांच्या प्रवासात फेसबुक आता जागतिक स्थरावर अतिशय लोकप्रिय आहे. फेसबुक हे सर्वांसाठी बनवले गेले आहे, साधरणतः 13 वर्षांवरील व्यक्ती ह्या फेसबुक वर आपले अकाउंट उघडू शकते. 2019 चा भारतातील सक्रिय फेसबुक मेंबर्स चा आकडा हा 300 लक्ष एवढा आहे.


फेसबुक वर आपण आपल्या दररोज च्या घडामोडी, बातम्या, माहिती, फोटो, व्हिडिओ, सामाजिक उपक्रम, शैक्षणिक उपक्रम, अशा बऱ्याच गोष्टी लोक येथे टाकतात. फेसबुक बिझनेस मध्ये आपण आपल्या व्यवसाय वा लोकप्रिय व्यक्तींच्या नावाने फेसबुक पेज बनवता येते. तसेच फेसबुक ग्रुप च्या साहाय्याने आपण एकाच विषयामध्ये आवड ठेवणाऱ्या लोकांचा समूह आपण बनवून त्यात आपण डिस्कशन पासून सेल्लिंग पर्यंत सर्व प्रकारचे संवाद साधू शकतो. फेसबुक इव्हेंट्स च्या माध्यमातून आपण लोकांना आपल्या व्यवसाय वा व्ययक्तीत जीवनातील कार्यक्रमांबद्दल माहिती लोकांपर्यंत पोहोचवू शकतो.


फेसबुक ची Paid Advertising ची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे, याद्वारे आपण आपल्या चाहते व ग्राहकांपर्यंत पोहचू शकतो. तसेच फेसबुक वरून आता पैसे कमण्याची सुद्धा आपल्याला संधी आहे. आपल्या व्हिडिओ द्वारे, YouTube सारखे.


जर सर्व गोष्टींचा निष्कर्ष काढायचा तर सर्व सामान्य व्यक्तीपासून सेलिब्रिटीपर्यंत सर्व प्रकारचे व्यक्ती फेसबुक वापरतात.


2. इंस्टाग्राम । Instagram

2010 साली केविन सिस्ट्रॉम द्वारे तयार करण्यात आलेले व फेसबुक कंपनी व मार्क झुकरबर्ग च्या मार्गदर्शनाखाली इंस्टाग्राम वर पहिले पोस्ट करण्यात आली. इंस्टाग्राम हे फोटो व व्हिडिओ शेरिंग मोबाईल एप्लिकेशन आहे. इंस्टाग्राम हे फेसबुक च्या मालकीचे सोशल मिडिया आहे. युवा वर्गाचा व Visual Technology चा वाढता प्रवाह बघता फेसबुक ने हे एप्लिकेशन निर्माण केले आहे.


इंस्टाग्राम वर तुम्ही ट्रेंड्स, फॅशन, व मनोरंजन या विषयांबद्दल पोस्ट्स शेअर करतात. इंस्टाग्राम Stories वर आपण 24 तासांसाठी आपले फोटो व व्हिडिओ आपल्या Followers ला दाखवू शकतो. फेसबुक पेज ला कनेक्ट करून आपण इंस्टाग्राम बिझनेस अकाउंट तयार करता येते.


इंस्टाग्राम वर व्हिडिओ पोस्ट ची मर्यादा हि 1 मिनिट असून, आपल्याला येथे पोस्ट मध्ये हॅशटॅग चा वापर करता येतो. युवा वर्गात इंस्टाग्राम ची लोकप्रियता दिवसंदिवस वाढत आहे. फेसबुक प्रमाणेच आपण इंस्टाग्राम वर सुद्धा Paid Advertising द्वारे आपल्या चाहते व ग्राहकांपर्यंत पोहचू शकता.


फेसबुक प्रमाणेच सामान्य व्यक्तीपासून सेलिब्रिटीपर्यंत सर्वच व्यक्ती इंस्टाग्राम वापरतात. मुख्यतः तरुण वर्गात इंस्टाग्राम ची लोकप्रियता अधिकच आहे.


3. ट्विटर । Twitter

2006 साली जॅक डॉर्से, नोव्हा ग्लास, बिझ स्टोन आणि इवान विलियम्स या चौघांनीं ट्विटर तयार करुन सर्वांसाठी लाँच केले. कमी शब्दात जास्त व्यक्त होण्यासाठी ट्विटर चा वापर केला जातो. ट्विटर वर पहिले 140 शब्दांमध्ये आपण ट्विट करू शकत होतो, आता ट्विट ची मर्यादा 140 वरुन 280 केले आहे. ट्विट करताना आपण यात हॅशटॅग चा वापर करु शकतो तसेच ट्विटर हँड्लर चा वापर करुन कोणत्याही ट्विटर युसर ला मेंशन करू शकतो.


ट्विटर मध्ये ट्रेंडिंग हॅशटॅग व ट्विटर लिस्ट असे वैशिष्ट्ये आहेत. ट्विट मध्ये आपण मजकूर, फोटो तसेच व्हिडिओ व लिंक्स पण टाकू शकतो. आपण आपल्या मित्रांना व आवडत्या व्यक्तींना Follow करुन त्यांचे सर्व ट्विट व अपडेट्स आपल्या Timeline ला मिळवू शकतात.


ट्विटर हे सेलेब्रिटींमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. नेता, अभिनेता, प्रत्येक क्षेत्रातील मोठमोठ्या व प्रतिष्ठित व्यक्ती या ट्विटर वर असून ते ट्विटर वरुन व्यक्त होत असतात.


ट्विटर वर सुद्धा आपण Paid Advertising करु शकतो. व आपल्या व्यवसायाला आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचू शकतो.


हे आहेत भारतात सर्वात जास्त लोकप्रिय 3 सोशल मिडिया प्लॅटफॉर्म! जवळपास 70-75 सोशल मिडिया प्लॅटफॉर्म आहेत जे भारतात वापरले जातात त्यात अतिशय लोकप्रिय असे हे 3.


मित्रांनो, तुम्हाला कोणत्या विषयावर माझ्याकडून लेख हवा आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट द्वारे सांगू शकतात, हा लेख तुम्ही आपल्या मित्र परिवारापर्यंत शेअर करा व वाचत राहा माझा ब्लॉग नवनवीन डिजिटल तंत्रज्ञायाबद्दल जाणून घ्यायला.

Happy Digital Learning..!!!

Learn Digital! Go Digital!

440 views0 comments

Comentários


bottom of page