top of page
Search
Writer's pictureNikhil Morankar

नेट तटस्थता म्हणजे काय? । What is Net Neutrality?


Net Neutrality
Net Neutrality

नेट तटस्थता (Net Neutrality) हा एक सिद्धांत आहे. ज्यात म्हटले गेले आहे कि, इंटरनेट सर्विस देताना इंटरनेट सर्विस देणाऱ्या कंपनी (ISP) कोणत्याही प्रकारचा पक्षपात करणार नाहीत. इंटरनेट वापरकर्त्या ला सर्व वेबसाइट सारख्या रीतीने वापरता येतील.


आपल्याला तर माहीतच आहे कि इंटरनेट हे केबल च्या माध्यमातून जगभरात पसरलेले आहे. समुद्रापासून भुगर्भावर सगळी कडे इंटरनेट च्या केबल टाकल्या गेल्या आहेत आपण जे इंटरनेट चे पैसे देतो ते त्या केबलचेच पैसे समजावे. मग भारतातील ISP कंपनी कोणत्या तर BSNL, Bharti Airtel, Tata Communication, You Telecom, Reliance ह्या काही टॉप ISP.


जेव्हा आपण एखाद्या कंपनी चे इंटरनेट वापरत असतो तेव्हा त्या कंपनीवर असते कि आपल्याला कोणत्या वेबसाइट किंवा मोबाईल अँप्लिकेशन ला वापरताना चांगली स्पीड मिळाली पाहिजे. Bandwidth मध्ये कोणत्या लिंक ला किती Space मिळावा हे ठरवणे ISP च्या हातात असते, हेच होऊ नये आणि कोणत्याही वेबसाइट आणि अँप्लिकेशनला पक्षपाताचा फटका बसू नये म्हणून Net Neutrality हि Concept मांडण्यात आली.


प्रत्येक देशामध्ये टेलिकॉम क्षेत्रातील सरकार अधिकृत एक संघटना असते जी ठरवते कि Net Neutrality ला Support करायचा कि विरोध. भारत देश हा नेट तटस्थता च्या बाबतीत सतर्क देश असून, Telecom Regulatory Authority of India (TRAI) संपूर्णपणे नेट तटस्थतेला पाठिंबा देते.


नेट तटस्थताचे उदाहरण द्यायचे म्हटले तर २०१४ साली अमेरिका मधील ISP कंपनी Compcast ने Netflix च्या वेबसाइट ची स्पीड कमी केली, त्यामुळे जो पण Comcast इंटरनेट वापरकर्त्यांना समस्या उद्भवू लागल्या आणि मग शेवटी Netflix कंपनीने Compcast कंपनी ला पैसे देऊन स्पीड सुरळीत केली.

भारतामध्ये सुद्धा असा प्रयत्न Airtel व Facebook द्वारे करण्यात आलेला परंतु TRAI ने कारवाही करून त्यांचा हा प्रयत्न मोडून काढला. अमेरिका मधील Federal Communications Commission (FCC) मात्र नेट तटस्थताच्या विरोधात आहे.


Net Neutrality म्हणजे काय हे अगदी सोप्या भाषेत सांगायचे म्हटले तर, समजा आपण एका Highway वरून आपली गाडीने प्रवास करतोय आणि त्या ठिकाणी दोन प्रकारच्या Lane आहेत. पहिली lane आहे General ज्यामध्ये सर्वच गाड्या जाताहेत, ट्रॅफिक आहे, आणि एका नॉर्मल स्पीड ने ती गाडी जात राहील. आणि दुसरी Lane आहे ती special ज्यामध्ये बिलकुल ट्रॅफिक नाही आणि काही पैसे आपण देऊन कमी वेळात, जास्त स्पीड ने गाडी चालवू शकतो.


अजून दुसरं उदाहरण द्यायचं म्हटले तर आता बऱ्याच धार्मिक स्थळांवर VIP दर्शन ची सुविधा चालू केली गेलीय. ज्यात साधारण भाविक नेहमीप्रमाणे दर्शन घेतो ज्यासाठी ४-५ तासांचा कालावधी लागू शकतो दुसरीकडे VIP दर्शन अगदी १०-१५ मिनिटांमध्ये होते.


Net Neutrality ला पाठींबा देणे किंवा विरोध करणे ह्याचे बरेचसे पहेलू आहेत. माझ्या मते तरी आपण Net Neutrality ला पाठिंबा दिला पाहिजे परंतु काही काही ठिकाणी Net Neutrality ला विरोध सुद्धा करावासा वाटतो जसे कि पुणे विद्यापीठाचे Results लागल्यावर आपल्याला बऱ्याच प्रमाणात कसरत करावी लागते कारण एक सोबत हजारो लोक तीच वेबसाइट वापरत असतात. अशा वेळेस होणारी फजिती पाहता मात्र Net Neutrality विरोध करायची भावना निर्माण होते.


तुम्हाला हा लेख कसा वाटला नक्की कळवा कंमेंट मध्ये, तुम्हाला अजून कोणत्या विषयावर माझ्या कडून माहिती किंवा लेख हवा असेल ते सुद्धा तुम्ही कमेंट मध्ये टाकू शकतात.


Happy Digital Learning..!!!

Learn Digital! Go Digital!

413 views0 comments

Comments


bottom of page